येत्या ५ दिवसात  राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला अंदाज

0
606

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,१०/१०/२०२१
येत्या ५ दिवसात  राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने वर्तवला अंदाज

राज्यात पावसानं चांगलाच जोर धरल्याचं पाहायला मिळतं आहे. सप्टेंबर अखेरिस सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता पुन्हा एकदा राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसळीकर  पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशी माहिती के.एस. होसळीकर यांनी दिली आहे.