पाचोरा येथील दोन्ही भावंडानी गाजवली अमेरिका होस्टन येथील ज्युनिअर ऑलम्पिक स्पर्धा

0
942

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,१४/१०/२०२१
पाचोरा येथील दोन्ही भावंडानी गाजवली अमेरिका होस्टन येथील ज्युनिअर ऑलम्पिक स्पर्धा
पाचोरा येथील मूळ रहिवासी श्री सचिन पाटील केंद्रप्रमुख गोंदेगाव यांचे पुतणे व सध्या पुणे विद्यापीठ येथे कार्यरत असलेल्या प्रा नितीन प्रकाशराव पाटील यांच्या 2 ही मुलांनी पाचोऱ्याचे नाव ज्युनिअर ऑलम्पिक रोप स्कीपिंग स्पर्धेत गाजवले
अमेरिका येथील होस्टन येथे पार पडलेल्या या ऑनलाइन स्पर्धेत भार्गव नितीन पाटील याने भारताकडून खेळताना 1 सुवर्ण पदक 1 रौप्य पदक व जागतिक क्रमवारीत चौथे स्थान पटकावले
व शिवम नितीन पाटील याने जागतिक क्रमवारीत 5 वे स्थान पटकावले
दोन्ही भावंडांनी पाचोऱ्याचे नाव गाजवून भारताचा जागतिक क्रमवारीत झेंडा रोवला त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.