पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

0
806

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,16/10/२०२१

पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आजपासून सलग पाच दिवस म्हणजेच 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यात 16 ऑक्टोबर रोजी नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर रोजी नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. खरे तर 14 ऑक्टोबर रोजी राज्यभरातून मान्सूनने एक्झिट घेतली आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात तो आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा मंगळवार आणि बुधवारी रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.