आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,१७/१०/२०२१
पाचोरा – तालुक्यातील नेरी येथील कामगार आपल्या ट्रॅक्टर सह जात असतांना ट्रॅक्टर वरुन मजुराचा खाली पडताच समोरुन येणाऱ्या वाहनाने चिरडले. यात एक जागीच ठार झाला.
पाचोरा तालुक्यातील नेरी येथील दोन ट्रॅक्टर कामगार आणि साहीत्य घेऊन मध्य प्रदेश येथील साखर कारखाना येथे उसतोडीला जात असताना बिल्दी धरण पुढे अचानक ट्रॅक्टर वरुन मयत लुकमानखा उस्मानखा शेख (५०) हा पडताच समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना दि. १७ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. घटनास्थळी नेरी येथील बंटी भोई सह छोटु पठाण हे पोहचल्यावर त्यांनी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना मदतीसाठी फोन केला मदत मिळाली. ट्रॅक्टर चालवणारा मयताचा मुलगा बबलु शेख होता. अर्ध्या वरच प्रवास सोडून दोघी ट्रॅक्टर पाचोरा येथे आणण्यात आल असून मयताचे मृतदेह शवविच्छेदन साठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. घटनेची माहिती मिळताच नेरी गावात शोककळा पसरली