नांद्रा ता.पाचोरा येथील रस्त्याच्या विविध समस्या दिवाळीपूर्वी सोडविण्याचे लेखी आश्वासन

0
663

आरोग्यदुत न्युज
किरण सोनार नांद्रा (प्रधी)
दि,द.२१/१०/२०२१

 

नांद्रा ता.पाचोरा येथील रस्त्याच्या विविध समस्या दिवाळीपूर्वी सोडविण्याचे लेखी आश्वासन.२७ व २८जूलै रोजी तिन महिन्यापूर्वी ग्राम पंचायत यांनी तहसिलदार कैलासजी चावडेसाहेब यांच्या दालनात झालेल्या चर्चा होऊन ही अशोका बिडकाॕन यांनी कोणतेच प्रश्न मार्गी न लावल्यामुळे पुन्हा ग्राम पंचायत कमिटी नांद्रा व ञस्त ग्रामस्थ यांनी पुन्हा स्मरणपञ देऊन समस्या निराकरण व्हाव्यात म्हणून दि.२१आॕक्टोंबर रोजी तिव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन संबंधित विभागांना दिले होते परंतु पोलिस विभागाच्या ,प्रांताधिकारी साहेब,तहसिलदारसाहेब,महामार्गाच्या अधिकारीवर्ग यांच्या समवायतून चर्चा करुन आपण यातून मार्ग काढण्याचा भूमिकेतून पाचोरा येथे प्रांताधिकारी कार्यलयात बैठक घेण्यात आली यामध्ये प्रांताधिकारी डाॕ.विक्रमजी बादलसाहेब,तहसिलदार कैलासजी चावडेसाहेब,डि.वाय.एस.पी.भारतजी काकडे साहेब,पोलिस निरीक्षक किसनजी पाटिलसाहेब, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी कल्याणी पाटिलमॕम,राहूल गांगुर्डे व गावातील ग्रा.प.कमिटी ,शांतता कमिटी शिष्टमंडळ व ग्रामस्थ यांच्यात रस्त्याच्या संदर्भात मागणी केलेल्या विविध समस्यावर प्रत्येक मुद्दद्यावर प्रांतसाहेब यांनी सविस्तर चर्चा घडवून आणून दिवाळी पूर्वी महत्त्वाचे विषयापैकी बसस्थानकावर पुरुष व स्ञी स्वतंत्र मुतारी बांधणे,रस्त्यावरचा फफूटा उडणार्य कच्च्या रस्त्याच्या ठिकाणी जेसीबी ने लेव्हल व स्लोब करुन जो पर्यंत डांबरीकरण होत नाही तो पर्यत खडी कच टाकून त्यावर दररौज पाणी मारणे,स्वामी विष्णुदासजी महाराज यांच्या आश्रम कडे जाणारा रस्ता व्यवस्थित नाली करुन स्लोब व भराव करुन पॕरेलल रस्ता नली करणे,प्राथमिक आरोग्य केंद्राचा तोडलेला अगोदरचा सिंमेट रस्ता दुरुस्त करुन देणे ,दलित वस्तीकडे जाणारे पूर्व कडिल शेतातील पाण्याचा सोर्स गावातील नालीची लेव्हल करुन देणे व शक्य असल्यास पाईप टाकणे, या सर्व विषयावर शक्य तितक्या लवकर म्हणजे दिवाळी पूर्वी पूर्ण करण्याची अमंलबजावणी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी डाॕ.विक्रमजी बादल यांनी आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या संबधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिल्यात याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा व ग्रामस्थांच्या सर्व समस्यांचे निराकरण पण शांतता मार्गाने व चर्चाच्या माध्यमातून सुटावेत म्हणून म्हणून डि.वाय.एस.पी.भारतजी काकडे,पोलिस निरीक्षक किसनजी पाटिल,तहसिलदार कैलासजी चावडेसाहेब,राष्ट्रीय महामार्गाच्या विभागीय अभियंता कल्याणजी पाटिल यांनी स्वतः नांद्रा स्पाॕटवर येऊन नांद्रा बसस्थानक पासून तर गावालगतच्या पुलापर्यत पाहणी करुन ग्रामस्थांनी मागणी केलेल्या सर्व समस्या प्रत्यक्ष पाहिल्या व त्यांचे दिवाळी पूर्व निराकरण करण्याचे लेखी आश्वासन प्रांतांधिकारी साहेब यांच्या कार्यलयात चर्चा करुन दिले याप्रसंगी ग्रा.प.कमिटी,शांतता कमिटी शिष्टमंडळ नांद्रा ,पोलिस पाटील,रस्त्यालगत ञस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

 

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,२०/१०/२०२१
महिला शौचालय व व्यायामशाळेचा प्रश्न तडीस
प्रभाग सहा मधील शिवसेनेचा शिवसंवाद फलदायी
शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील नागसेन नगर भागातील महिला भगिनींनीसह पुरुष बाधवांसाठी सार्वजनिक शौचालय तर तरुणांसाठी व्यायाम शाळेच्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या विषयावर मार्ग काढत परिसरातील खाजगी जागा विकासाकाकडून जागा बक्षिसपत्र करून घेत दोन्ही जागांचे आगामी महिनाभरात भूमिपूजन करण्याचे आश्वासन मिळाल्याने शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवसंवाद फलदायी ठरला आहे.या निर्णयाने परिसरातील नागरिक सुखावले असून महिलांनी व तरुणांनी आ.किशोर अप्पा पाटील, शिवसेना नेते मुकुंद बिलदीकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, जागा विकासक प्रेमनारायण तिवारी यांचेसह पत्रकार प्रवीण ब्राह्मणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
पाचोरा शिवसेनेच्या वतीने शहरात विविध प्रभागात शिव संवाद अभियानांतर्गत बैठकांचे सत्र सुरू असून त्याअंतर्गत त्या त्या प्रभागातील नागरिकांनी या कार्यक्रमात मांडलेल्या समस्या समजून घेऊन नगरपालिकेच्या व आ.किशोर अप्पा पाटील यांच्यावतीने त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी नियोजन केले जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रात्री ८ वाजता प्रभाग क्रमांक सहा मधील नागसेन नगर भागात शिवसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला नगराध्यक्ष संजय गोहिल, शिवसेना नेते मुकुंद बिलदीकर,जागा मालक प्रेमनारायन तिवारी, मनोज तिवारी, शहर प्रमुख किशोर बारावकर, पत्रकार प्रवीण ब्राह्मणे, युवा सेनेचे संदीप राजे पाटील, सुमीत सावंत, विशाल पवार,आकाश पाटील,रवींद्र बाळदकर,राजेंद्र केदार, माजी नगरसेवक अविनाश सावळे, यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी राजेंद्र खर्चाने,आकाश खैरनार,अनिल लोंढे, मायाताई केदार, अमोल पवार अनुराग खेडकर, भय्या खेडकर यांनी या भागातील प्रमुख समस्या कथन केल्या. यात शौचालय, व्यायाम शाळा, भूमिगत गटारी, पथदिवे, नाल्या ,स्वच्छता, पुराच्या पाण्याचे नियोजन, खुले भूखंड विकास कामे आदी विषय समोर आले. सर्व समस्यां समजून हेत त्या सोडवणुकीचे आश्वासन देत मुकुंद बिलदीकर यांनी आ.किशोर अप्पा पाटील व पाचोरा नगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या व प्रस्तावित विकास कामांची माहिती दिली.
बैठकीला नागसेन नगर भागातील संदीप गायकवाड,लखन वाघ, दीपक खैरे,गायत्री सातदिवे,
चंद्रकांत नरवाडे,निलेश जाधव,सूरज महिरे,अनिल जोगळे, छन्नु सपकाळे,किरण सोनवणे,आकाश बनसोडे, अशोक गायकवाड,राजू सोनवणे,संतोष खैरनार,विशाल मोरे ,तात्या सोनवणे,विशाल मोरे,गौरव साठे,सागर वाघ,
यांची तर जनता वसाहत भागातील मिलिंद तायडे,विश्वनाथ भिवसने, विजय गायकवाड, रवींद्र खैरे, किरण अहिरे, सागर अहिरे,मयूर ब्राह्मणे, सचिन नंनोरे, सचिन केदार, आकाश थोरात, विकास थोरात, तपन शिरसाट,नवीन ब्राह्मणे, विशाल सावळे,शुभम खर्चाने, रोहित बाळदकर, तन्मय ब्राह्मणे, रवींद्र अहिरे, सोनल बागुल, आकाश बनसोडे यांची उपस्थिती होती.