आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूकांसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी

0
350

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,२२/१०/२०२१
आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूकांसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूकांसाठी मोफत प्रशिक्षणाची संधी

            या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील एकूण 450 बेरोजगारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपाचे असेल, प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित उमेदवारांना शासनातर्फे प्रमाणपत्र प्राप्त देण्यात येईल तसेच त्यांना आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी गुगल लिंक वर आपली माहिती/नोंदणी ऑनलाईन सादर करावी. नोंदणी करताना समोर नमूद शैक्षणिक पात्रतेनुसार कोर्स/जॉब रोल निवडावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.