पाचोरा परिसर गुर्जर समाज बांधवांतर्फे  पाचोऱ्यात सरदार वल्लभभाई पटेल जयंती होणार साजरी

0
192

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,२७/१०/२०२१
पाचोरा परिसर गुर्जर समाज बांधवांतर्फे  पाचोऱ्यात सरदार वल्लभभाई पटेल जयंती होणार साजरी

सरदार वल्लभभाई पटेल जयंती संपूर्ण देशात उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त येणाऱ्या दि. ३१ आॅक्टोबर रोजी पाचोरा येथील सुप्रसिध्द ध्येय कॅरिअर  अॅकेडमीतर्फे पाचोरा तालुक्यासह परिसरातील सर्व गुर्जर समाज आणि तत्सम पोटजाती मधील बांधवांना दि. ३१ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त ध्येय करिअर अँकेडमी, गणेश कॉलनी पाचोरा जि. जळगाव येथे गुर्जर व त्या मधील सर्व पोट जाती समाजातील बंधु – भगिनींनी सदर कार्यक्रमास उपस्थीत राहावे. तसेच गुर्जर समाजातील  विद्यार्थी – विद्यार्थीनी व युवक – युवतींना मनोगत व्यक्त करायचे असेल त्यांनी तयारी सह कार्यक्रमास उपस्थीती द्यावी. विशेष – मनोगत व्यक्त करणाऱ्या सर्व वक्त्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देण्यात येतील असे आवाहन प्रकल्प प्रमुख संदीप (भाऊ) महाजन यांनी केले आहे.