आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत विधवा भगिनींना धनादेश वाटप.

0
361

*आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत विधवा भगिनींना धनादेश वाटप.

पाचोरा : शासनाच्या महाराजस्य उपक्रमार्गात एकाच छताखाली विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांना वाटपाचा कार्यक्रम दि. ३/११/२०२० मंगळावर रोजी दुपारी १ वा तहसीलदार कार्यालय,पाचोरा येथे पाचोरा-भडगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते २१ विधवा भगिनींना धनादेशाचे वाटप करण्यात आले तसेच ५ व्यक्तींना रेशनकार्ड चे वाटप कारणात आले. तहसीलदार,तलाठी,अधिकारी व कमर्चारी वर्ग यांच्या वर्गणीतून नगरपालिका सफाई कर्मचारीवर्गाना टी शर्ट , टोपी, बूट अशा स्वरुपाचे किट्स वाटप करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले कि, विधवा भगिनींच्या दुःखांत मी सहभागी आहे. आपला आधार गेला म्हणून शासनाच्या माध्यमाने जी अल्पशी मदत देऊ केली तिचा उपयोग आपल्या संसारासाठी करावा. तहसील कार्यालय,पाचोरा यांच्या माध्यमाने जी मदत सफाई कामगारांना केली त्याबद्दल मनापासून तुमचे अभिनंदन करतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना सहजपणे देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाने सतत कार्यरत राहावे. भविष्यात कोरोना होऊ नये याकरिता मास्क वापरावा, हात स्वच्छ धुवावेत, सुरक्षित अंतर राखावे हीच कोरोना लस आहे असे समजावे असे विनम्र आवाहन त्यांनी नागरिकांना केले. यावेळी उपविभागीय अधिकारी,पाचोरा राजेंद्र कचरे यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी,पाचोरा राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, गणेश पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख ऍड. अभय पाटील, सचिन सोमवंशी, राजेंद्र पाटील, नाना वाघ, आदी मान्यवर तथा कर्मचारी वर्ग,लाभार्थी बंधू , भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक – कैलास चावडे तहसीलदार पाचोरा यांनी केले. संचलन – आर. डी.पाटील यांनी केले.