१५ हजार रु.किमतीचा मोबाईल केला परत ( स्वातंत्र्य सैनिक सुपुञ रमेश आबा )

0
596

आरोग्यदुत न्युज
किरण सोनार नांद्रा (प्रतिनिधी)
दि,५/११/२०२१
१५ हजार रु.किमतीचा मोबाईल केला परत – स्वातंत्र्य सैनिक सुपुञ रमेशआबा याँचा असाही प्रामाणीक पणा येथे गवंडी कामानिमित्त आलेल्या पाचोरा येथील नाजीम शेख नामक मजूराचा मोबाईल शेतरस्त्याच्या दिशेने  जात असताना अचानक खिशातून कोठेतरी खाली पडला, तो मोबाईल नांद्रा येथील स्वातंत्र्य सैनिक कै.माधवराव लाला सूर्यवंशी यांचे  सुपुञ श्री.रमेश माधवराव पाटील यांना आपल्या  शेतात जात असतांना रस्त्याच्या कडेला पडलेला सापडला,त्यांनी आजू बाजूला विचारपूस केली असता  कोणीही त्याचा हक्क दाखवला नाही  शेवटी त्यांनी तो आपल्याकडे ठेवून  घेतला व शेतात नाघून गेले.त्यांनंतर ते शेतातून घरी येत असताना त्यांच्या सोबत त्यांचा मोठा मुलगा बद्रीनाथ सूर्यवंशी येत आसताना संबंधित मोबाईल धारक व्यक्ती नाजीम शेख त्यांना इतरत्र  मोबाईल शोधत असतांना  दिसले.त्यवेळी रमेशाआबा सूर्यवंशी व त्यांचा मुलगा बद्रीनाथ यांनी त्यांना विचारले काय शोधत आहेत ,त्यावेळी  त्यां इसमाने माझा मोबाईल हरवला आहे तो मी चोहीकडे शोधत असल्याचे सांगितले त्यावेळी  पूर्ण चौकशी व सत्यता पडताळणी केल्यावर त्यांची खाञी झाली की  हा सापडालेला मोबाईल त्यांचाच आहे त्यानंतर त्यांनी तो मोबाईल साधारण गवंडी काम करणाऱ्या इसम नाजीम शेख ला परत केला  मोबाईवाल डोळ्यासमोर पाहताच त्याच्या डोळ्यांत आनंद अश्रू वाहू लागले  व आज ही समाजात प्रामाणिक माणसे शिल्लक आहेत हे बोलून त्याने त्यांची कृतज्ञता व्यक्त केलि याप्रसंगी तेथे  महेश गवादे सर, चंद्रकांत तावडे, सत्तार मिस्त्री,गौरव साळुंखे, स्वप्नील सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी  रमेशआबाँनी दाखवलेल्या प्रामाणिक पणा व माणुसकी धर्म याचे परिसरात कौतुक होत आहे.