पाचोऱ्यात भुयारी मार्गात न. पा. दुर्लक्षाने अनेक जखमी कॉंग्रेस आंदोलन करणार

0
398

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,५/११/२०२१
पाचोऱ्यात भुयारी मार्गात न. पा. दुर्लक्षाने अनेक जखमी कॉंग्रेस आंदोलन करणार

पाचोरा – शहरातील छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गात न. पा च्या दुर्लक्षामुळे अनेक जखमी होत आहे याकडे न. पा. त्वरित लक्ष न दिल्यास कॉंग्रेस ने आंदोलनाचा इशारा दिला आहे
पावसाळ्यात पाऊस बंद झाल्यावर सालाबादाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गात पडलेली माती चा चिखल होवुन तीला चिकटपणा येऊन मोटारसायकल स्वार धडाधड पडुन जखमी होत आहे. जो पडला त्याला आजुबाजुला असलेले मदत करुन अपघातग्रस्तांना हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी दाखल करत आहे. तासाला लोक पडत आहे. आज दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळ पासून अनेकजण पडले काहींना किरकोळ मुकामार लागला तर काहींना फॅक्चर झाले आहे. जखमीत सहीष्णा सोमवंशी, उन्नती अग्रवाल यांना मुकामार लागला श्रेयस हॉस्पिटल मध्ये डॉ. अंनत पाटील यांनी प्रथमोपचार केला तर , रोहन पाटील, याला वृंदावन हॉस्पिटल ला दाखल केले त्याच्या सोबत अजुन काहींना लागले नाव माहीत पडु शकले नाही  मेडीकल चालक पवन येवले यांचा हाथ फ्रॅक्चर झाला असुन त्यांच्या उजव्या हातावर जळगाव येथे शस्त्रक्रिया करण्यात आली
दरम्यान कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी उपविभागीय अधिकारी श्री बादल यांना निवेदन देऊन तात्काळ या गंभीर बाबी कडे लक्ष देण्याची मागणी केली असून यात छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गात दर वर्षी लोक पडतात याचे कारण रस्त्याच्या कडेला असलेल्या पाणी निघणार्‍या गटारी खोल करायला मागिल वर्षात* *सांगितले मात्र न. पा. संबंधित अधिकारी यांनी थाथुरमातुर काम करुन यावर  बिले काढली जातात  मागिल काळात मी* *स्वतः उभे राहून रात्री अग्निशमन गाडीने रस्ता स्वच्छ केला होता. न. पा. तात्काळ रस्त्याच्या दोघा बाजुने गटार खोल करावी आणि शहरातील नागरिकांना अपघात मुक्त करावे अशी मागणी केली आहे. न. पा. आठवड्या काम न केल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा शेवटी श्री सोमवंशी यांनी दिला आहे. जे लोक जखमी होत आहे त्यांनी संतप्त भावना व्यक्त करीत आहेत तर आम्ही पडणारे येणाऱ्या काळातील मतदार आहोत याची जाणीव सत्ताधारी यांनी ठेवावी अशी भावना जखमी व्यक्त करीत आहेत