नगरसेविका योजना पाटील यांनी साजरा केला अनोखा भाऊबीजोत्सव

0
485

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,७/११/२०२१

भडगांव – महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी आपल्या माहेरी आमडदे येथे भारतीय संस्कृतीत बहिण भावाचे पवित्र नाते जपणारा दिपावली पर्व भाऊबीज सणोत्सव निराधार गरजु शेतमजूर असलेल्या बहिण भावांसोबत साजरा करून एक आदर्श संस्कृतेचा वारसा जपला. वडील मा.सरपंच तथा चेअरमन स्वर्गीय हिरामण आण्णा भोसले यांचे स्मृतीपित्यर्थ बंधुना ड्रेस व भगिनींना साडीचोळी भेटवस्तु प्रदान करून प्रगती व उत्तम आरोग्यसाठी शुभेच्छ्या दिल्या. योजना पाटील यांनी असंख्य गरजु निराधार शेतमजुर बंधू भगिनी यांच्या सोबत भाऊबीज सण साजरा केल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद आभार व्यक्त करीत होता. सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.