आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,८/११/२०२१
आरोग्यदुत न्युज
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा तालुका वतीने राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे व राज्य शासनाच्या इतर कर्मचारी वर्गाप्रमाणे वेतन,भत्ते, व ईतर सोईसुविधा मिळाव्यात या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या संपला पाचोरा आगारात जाऊन पाठिंबा दिला.राज्य शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक तीव्र पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा देखिर देण्यात आला.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, शुभम पाटील तालुका अध्यक्ष पाचोरा,आबा पाटील ता. अध्यक्ष भडगाव, ऋषिकेश भोई, जितेंद्र नाईक ,शुभम देठे चेतन पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे प्रशांत पाटील वाल्मीक जगताप सनी पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.