आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन

0
473

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)

दिनांक – 9 नोव्हेंबर, 2021

आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी

इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन
जळगाव – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उध्द्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या क्षेत्रांतील संसाधनांमधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा. याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारव्दारा प्रधानमंत्री कौशल्य विकास प्रशिक्षण ३.० योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८ ते ४५ वर्षे वयोगटातील एकूण ४५० बेरोजगारांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव, ग्रामीण रुग्णालय, बोदवड, ग्रामीण रुग्णालय, चाळीगसाव येथे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण ऑन जॉब ट्रेनिंग स्वरुपाचे असेल. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षित उमेदवारांना शासनातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानुसार त्यांना आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या सुवर्णसंधीचा लाभ घेत प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील गुगल लिंकवर आपली माहिती/ नोंदणी ऑनलाईन सादर करावी. नोंदणी करताना समोर नमूद शैक्षणिक पात्रतेनुसार कोर्स/जॉब रोल निवडावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 0257-2959790 वर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता, वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
गुगल लिंक :- https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeW0am6q-9D-
wedbHbknkC7RZ4oOoz53Lx1bq0YfmfYKuu0NQ/viewform?usp=pp_url