पाचोरा शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
1661

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,१०/११/२०२१
पाचोरा शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
पाचोरा मतदार संघात सुरू असलेल्या विकास कामांच्या सापाट्याने प्रभावीत होऊन पाचोरा शहरातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत  शिवसेना उपनेते तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
ना.गुलाबराव पाटील मंत्री-यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक तथा पाचोरा शहर भाजपाचे उपाध्यक्ष देवराम लोणारी,भाजपा मच्छीमार सोसायटी अध्यक्ष्य युवराज भोई,भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष्य अजय सोनार, भाजपा उपाध्यक्ष पाचोरा शहर रघुनाथ कुमावत आदी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर  प्रवेश केला.
यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर आप्पा पाटील,संपर्क प्रमुख सुनील पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने,जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे , नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपजिल्हाप्रमुख दिनकर देवरे, जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, जि.प.सदस्य दीपक राजपूत,  माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर, शिवसेना शहरप्रमुख बंडू चौधरी आदी शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.