एसटी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनास भा.ज. पा.महिला जिल्हा अध्यक्षांचा पाठिंबा

0
655

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,१७/११/२०२१
एसटी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनास भा.ज. पा.महिला जिल्हा अध्यक्षांचा पाठिंबा
एसटी कर्मचारी  संघटनेच्या  पाचोरा येथे बेमुदत सुरू असलेल्या संपाला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे पाठिंबा देण्यात आला. राज्य भरातील एस.टी. कामगारांनी आपल्या प्रमुख मागण्या साठी आठवडाभरापासून बे मुदत संप पुकारला आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या या संपाकडे  शासनाने दुर्लक्ष केले असल्याने  संपकरी संतापले असून इथे एका संपकरी ने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारीनी समुपदेशन करून आत्मदहन करण्यापासून रोखले.  शासनाने त्वरित संपकरी च्या भावना लक्षात घेऊन संप मिटवण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान यावेळी भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्षा रेखाताई पाटील यांनी यावेळी केले. यावेळी रेखा पाटील, साधना देशमुख ,नुतन पाटील , एस टी कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.