शहीद जवानाच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन !

0
1057

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,१८/११/२०२१
शहीद जवानाच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांनी केले सांत्वन !
पाचोरा :-  तालुक्यातील  सावखेडा बुद्रुक येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय-३५) हे पंजाब राज्यातील पठाणकोट येथे शनिवारी मध्यरात्री देशसेवा बजावीत असतांना अतिरेक्यांच्या हल्ल्यात दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
ना. गुलाबराव पाटील यांनी हुतात्मा मंगलसिंग परदेशी यांचे आई वडील, भाऊ, पत्नी, मुलगा-मुलगी यांचे सांत्वन केले. परदेशी कुटुंबाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार किशोरआप्पा पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंह राजपूत व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.