एसटी कर्मचारी बांधावाकडून प्रवासींसाठी जाहीर आवाहन

0
1300

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
सेवेसाठी एस टी
(महाराष्ट्र राज्य परिवहन
एसटी कर्मचारी बांधावाकडून प्रवासींसाठी जाहीर आवाहन
प्रवासी बांधवानो एसटी तोटयात असल्याचे कारण दाखवुन जनतेच्या पैशातुन कमावलेल्या सार्वजनिक मालमत्तेचे खाजकीकरण करून स्वतःच्या घशात घालु पाहणा-या सरकार व मंत्री मंडळाचा डाव हानुन पाडण्यासाठी एकत्र या व आपली सार्वजनिक मालमत्ता वाचवा.
प्रवासी बांधव व जनतेस जाहिर आवाहन करण्यात येते की, एसटी महामंडाळाची महाराष्ट्रात दोन असलेली मालमत्ता असुन एक नंबर वन विभाग आहे. परंतु वन विभाग राज्य शासनात असल्याने सत्तेवर असलेल्या राजकारनी लोकांना त्याची विल्हेवाट लावता येत नाही परंतु एसटी मालमत्ता ही महामंडळात येत असल्याने एसटी तोटयात दाखवुन एसटीची, सार्वजनिक जनतेची मालमत्ता खाऊ पाहणा-या रातकारणाला विरोध करून आपली मालमत्ता वाचवा.
एसटी शासनात विलीन झाल्यास जनतेचे फायदे
१) विलीनीकरण करून झाल्यास एसटी च्या सार्वजनिक मालमत्तेवर होणारा भ्रष्टाचार थांबेल.
२) गाव तिथे एसटी म्हणजे महाराष्ट्राचे दळण वळण आणखी बळकट.
३) जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध, अपंग, इतर सवलती टीकुन राहतील. (४) राज्य शासनात विलगीकरण झाल्यास अंदाजे ४० % तिकीट दर कमी होईल.
५) महाराष्ट्र राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती अधिक बळकट होईल.
एसटी चे खाजगीकरण झाल्यास जनतेचे होणारे नुकसान
१) गांव तेथे बस जाणार नाही.
२) कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.
३) खाजगी मालक जनतेकडुन अव्वाचे सव्वा भाडे आकारणी करतील.
४) जोपर्यंत गाडी भरत नाही, तोपर्यंत गाडी निघणार नाही. ५) विद्यार्थी पास, जेष्ठ नागरिक, पत्रकार, अंध, अपंग यांच्या योजना बंद होतील व विद्यार्थी,
जेष्ठ नागरिक, पत्रकार, अंध, अपंग यांचे नुकसान होईल. ६) खाजगीकरण झाल्यास जनतेला अडी अडचणीं जावे ल.
म्हणुन आम्ही एसटी कर्मचारी आवाहन करतो की, आपली माजमत्ता टिकविण्यासाठी एसटी चे शासनात विलीनीकरण होणे गरजेचे आहे. एकत्र या संघटीत व्हा, एसटी वाचवा हे करण्यासाठी प्रवासी बांधव व जनतेला चालक, वाहक व यांत्रिकी कर्मचारी यांचेकडुन जाहिर आवाहन करण्यात येत आहे. आपल्या हक्काची एस. टी. वाचवा.
– आपला एसटी कर्मचारी