जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय, जळगाव अंतर्गत ग्रामीण रुग्णालय,भडगाव येथे भव्य मानसिक आरोग्य शिबीर संपन्न झाले.

0
415

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे (प्रतिनिधी)

दिनांक – 26 नोव्हेंबर, 2021

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भडगाव तालुक्याचे तहसीलदार मा. श्री.मुकेश हिवाळे साहेब, तसेच शिबिराचे मार्गदर्शक व अध्यक्ष मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण साहेब, भडगावचे पोलीस निरीक्षक  श्री.अशोक उतेकर साहेब, मुख्याधिकारी न. प. श्री.रविंद्र लांडे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता आकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पाटील, तज्ञ मार्गदर्शक डॉ. सुरज पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले

भडगावचे तसीलदार श्री.  मुकेश हिवाळे यांनी मानसिक आजाराबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मानसिक आजारावर वेळीच औषध उपचार केल्याने हा आजार नियंत्रनात राहतो व बरा होतो या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण साहेब यांनी मानसिक आजार झपाट्याने वाढत आहे  याची असंख्य कारणे आहेत जसे कोरोना महामारी,कौटुंबिक कलह,अतिवृष्टी,व्यसनाधीनता, अश्या अनेक कारणांमुळे मानसिक आजार होत आहे त्यावर उपचार घेणे खूप गरजेचे आहे  मानसिक आजार इतर आजारा प्रमाणे बरा होऊ शकतो. मानसिक आजारावर  वेळेत औशधोपचार व समुपदेशन हीच गुरुकिल्ली आहेत ह्या बाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. कांचन नारखेडे यांनी जिल्हा मानसिक कार्यक्रम बाबत माहिती दिली.
शिबिराचे सूत्रसंचालन मानसतज्ञ दौलत निमसे यांनी केले.  मान्यवरांचे आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ.साहेबराव अहिरे यांनी मानले
शिबिरात एकूण 157 रुग्णाची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 115 रुणांना औषधउपचार देण्यात आले.
शिबीर यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.साहेबराव अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश पाटील, जिल्हा मानसिक  आरोग्य कार्यक्रमातील कार्यक्रम अधिकारी, डॉ.कांचन नारखेडे, मानसतज्ञ दौलत निमसे, मनो.सा.कार्यकर्त्या ज्योती पाटील, मनो.वि.परिचारक विनोद गडकर, प्रोग्राम असिस्टंट मिलीद बरहाटे, चंद्रकांत ठाकूर, तसेच सर्व ग्रामीण रुग्णालय,भडगाव येथील अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.