२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली {पोलिस बाॅईज असोसिएशन पाचोरा ]

0
347

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
 २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
{पोलिस बाॅईज असोसिएशन पाचोरा ]
दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे दहशतवाद्यांकडुन करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या जीवाची पर्वा न करता आतंकवाद्यांशी झुंज देतांना शहीद झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी व निष्पाप जनतेला पोलिस बाॅईज असोसिएशनतर्फे दि‌. २६ रोजी आयोजित कार्यक्रमात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया वसावे, पी. टी. सी. चेअरमन संजय वाघ, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेनेचे युवानेते सुमित किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर खान, सतिष चौधरी सह स्वातंत्र्य सैनिकांनी कॅण्डल लावुन भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. या भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाप्रसंगी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजहर खान व पी. टी. सी. चेअरमन संजय वाघ यांनी शहीद झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी व निष्पाप जनतेच्या कार्याला सलाम करत झालेल्या भ्याड हल्ल्याचा थरारक प्रसंग सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पोलिस बाॅईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, मंगलसिंग राजपुत, जिल्हा मार्गदर्शक डॉ. अतुल पाटील, जिल्हा सचिव प्रफुल पाटील, विधिविषयक सल्लागार उमेश राठोड, तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख, उपतालुका अध्यक्ष करण पाटील, कार्याध्यक्ष बंटी पाटील, संपर्क प्रमुख मोईन शकील शेख, तालुका विधीविषयक सल्लागार अॅड. प्रशांत भावसार, प्रसिद्धी प्रमुख बंडु सोनार, तालुका सचिव गौरव चौधरी, हर्षल पाटील यांनी परिश्रम घेतले.