आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,३०/११/२०२१
लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच अपघातात युवक ठार
भडगाव – पाचोरा रोडवरील दुचाकीस्वारांचा आमने-सामने अपघातात दोन जागेवर ठार झाले.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, घाटनांद्रा येथील बबलु उर्फ रामेश्वर मोरे वय२५ हा शेतात काम करण्यासाठी सेंदवा येथुन सालदार घेऊन येत असतांना पाचोरा ते भडगाव दरम्यान मदरसा जवळ समोरुन येणाऱ्या मोटारसायकल ची जोरदार धडक बसली यात एम. एच. २०डी एन ५९६२ वरील रामेश्वर मोरे व सेंदवा येथील निलेश बारेला हा जागीच ठार झाला. अपघातात मयत रामेश्वर मोरे हा घाटनांद्रा येथील शेतकरी असुन आजच त्याला लग्नासाठी बघायला मुलीकडील मंडळी आली होती. लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच रामेश्वर ला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची वार्ता कळताच मयताचे गोंदेगाव परीसरातील नातेवाईकांनी पाचोरा काॅग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना ही वार्ता कळविल्या नंतर श्री सोमवंशी यांनी तात्काळ भडगाव येथील टायगर गृप चे सद्दाम शेख, जुबेरा मिर्झा, अमीर शेख, बबलु पवार यांनी मदत कार्य केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत
Home Uncategorized लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच अपघातात युवक ठार भडगाव – पाचोरा रोडवरील दुचाकीस्वारांचा आमने-सामने...