आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,१/१२/२०२१
पिंपळगाव हरेश्वर ते भोजे दरम्यान आज तारीख 1 डिसेंबर रोजी सकाळी 11:20 वाजता झालेल्या अपघाताचे वृत्त कळताच अमोल भाऊ शिंदे यांनी वृंदावन हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तेथील डॉक्टर सर्व स्टाफ ने जखमींच्या येण्यापूर्वीच संपूर्ण तयारी केली. पाचोरा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, परेश पाटील, बाजीराव गीते, दीपक माने,राहुल यांनी जखमींना रुग्णालयात भरती करण्यासाठी खूप धावपळ केली. मात्र चौघांपैकी दोघे दुर्दैवाने गतप्राण झाले होते. या घटनेतील दोन गंभीर जखमींना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.