भडगाव येथे जागतिक एडस दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न

0
703

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,१/१२/२०२१
भडगाव येथे जागतिक एडस दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न
ग्रामीण रुग्णालय भडगाव आय सी टी सी व  अभिनव बहुउद्देशीय संस्था भडगाव संचालित अभिनव पॅरामेडिकल कॉलेज  यांच्या संयुक्त विद्येमाणे जागतिक एड्स दिनानिमित्त भडगाव येथे जनजागृतीपर रॅली व पथनाट्याचे आयोजन कोरोना संहितेचे पालन करून  करण्यात आल।  प्रारंभी तहसील कार्यालय येथे जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला
१ डिसेम्बर जागतिक  एड्स दिनाच्या या वर्षीच्या घोष वाक्य ”असमानता मिटवा ,एड्स संपवा ,महामारी संपवा ” या नुसार एडस विषयक तसेच महामारी च्या अनुशंघाने अभिनव  च्या विद्यार्थ्यांनी घोष वाक्य ,जनजागृतीपर पोस्टर ,तसेच एच आय व्ही एड्स या विषयावर पथनाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून जनजागृती केली
जनजागृती कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण रुग्णायाचे वैद्यकीय
अधीक्षक ,डॉ साहेबराव अहिरे ,डॉ निलेश पाटील ,अभिनव संस्थेचे डॉ दिलीप पाटील व आय सी टी सी समुपदेशक नामदेव पाटील यांनी एच आय व्ही एड्स विषयी उपस्थितांना मार्दर्शन केले ,व समाजातील असमानता ,एड्स,व महामारी संपवायचे आवाहन केले
कार्यक्रमाला अभिनव संस्थेच्या अध्यक्षा डॉ सुवर्णा पाटील ,डॉ   निखिल पाटील,डॉ राहुल पाटील , क्षकिरण  अधिकारी प्रदीप कोठावदे,औषध  निर्माण अधिकारी दीपक चव्हाण ,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी किरण मृतकर ,अधिपरिचारिका शोभा भुऱे ,श्रीमती शेख ,लिपिक श्रीकांत चौधरी,मनोज सोनवणे ,निलेश कंडारे केशव साळुंखे ,तसेच रुग्णालयाचे कर्मचारी वर्ग व अभिनव संस्थेचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते