स्व सतीश मित्तल पुरस्काराने दिलीप पाटील सन्मानित

0
510

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,२/१२/२०२१
स्व सतीश मित्तल पुरस्काराने दिलीप पाटील सन्मानित
दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी आष्टी जिल्हा बीड येथे इतिहास संकलन संस्थेच्या अधिवेशनात धरणगाव येथील श्री दिलीप रामू पाटील याना स्व सतीश मित्तल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे,इतिहास क्षेत्रात काम करीत असताना संघटनेच्या माध्यमातून सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याना या पुरस्कराने सन्मानित करण्यात येते,इतिहास संकलन समितीचे भूतपूर्व अध्यक्ष स्व डॉ सतीश मित्तल यांच्यानावाने हा पुरस्कार देण्यात येतो पाचोरा येथील स्व परशुराम कोंडीबा शिंदे यांचे स्मरणार्थ
देण्यात येणारा हा पुरस्कार या वर्षी धरणगाव येथील श्री दिलीप रामू पाटील यांना घोषित झाला, निवड समिती मध्ये प्रा डॉ राधाकृष्ण जोशी नगर, प्रा डॉ मुकुंद देवर्षी बीड, प्रा व्यंकटेश लांब संभाजीनगर, सौ भारती साठे जळगाव आणि प्रा नितीन सराफ अमरावती यांचा समावेश होता, श्री दिलीप पाटील यांचे चाळीस वर्षाचे संघटनात्मक योगदान, अभाविप ते सहकार भारती व्हाया किसान संघ, त्याचे तरुण भारत, जळगाव जनता बँक ,बालाजी विश्वस्त मंडळ धरणगाव,आदी समाज व शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रथम सिनेट पासून ते सदस्य आहेत,एक कार्यकर्ता ते प्रशासक असा हा प्रवास संघर्ष आणि सृजन तेचा आहे या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र ,संस्थेचे स्मृती चिन्ह असा आहे,पुरस्काराची सदर माहिती ही संकलन समितीचे प्रांत संघटक श्री रवींद्र पाटील यांनी कळवली आहे