झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्ताने भडगाव येथे कोरोना योध्दांचा सत्कार

0
227

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,४/१२/२०२१
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्ताने भडगाव येथे कोरोना योध्दांचा सत्कार
झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती निमित भडगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती रेखाताई पाटील , पाचोरा ता.अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला व पुरुषांना पुस्तक गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले कोरोना काळात कर्तव्य बजावता नां जिव धोक्यात घालून नगरपालिका साफसफाई कर्मचारी, नर्स ,सरपंच, उपसरपंच ,पोलीस पाटील, यांनी केलेल्या कार्याची दखल घेत सन्मानित करण्यात आले तसेच महीला कर्मचारी यांना साडी गुलाब पुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित खा. उन्मेष पाटील सतीष बापू शिंदे मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, जि.प. सदस्य मधूभाऊ काटे ,सुभाष पाटील, नूतनताई पाटील, भारतीय जनता पक्षाचे भडगाव तालुका अध्यक्ष अमोल पाटील जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.