सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथुन जवळच वनगाव येथे असलेल्या माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज सुशिल मुरलीधर इंग्लिश मेडीअम स्कूल येथे सोशल डिस्टंगसिंग चे पालन करून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली

0
449

आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरुवात झाली असून मराठी विषयाचा पेपर आहे.
नुकतीच कोरोणाच्या या भिषण संकटातून आपण थोडेफार बाहेर निघालो आहोत.
परंतु अजुनही कोरोणाची भिती संपलेली नाही. म्हणून शासनाने जनतेला कोरोणापासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना सांगितल्या आहेत व ते पाळणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन परिक्षा घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
आज मराठी विषयाचा पेपर होत आहे. शिक्षण विभागातील सर्व यंत्रणा सक्रिय झाली असून कोरोणाचे संकट लक्षात घेऊन परिक्षा घेत आहेत.
याचाच भाग म्हणून सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव येथुन जवळच वनगाव येथे असलेल्या माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज सुशिल मुरलीधर इंग्लिश मेडीअम स्कूल येथे परिक्षा सेंटरवर मराठी या विषयाचा पेपर देण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क व सेनिटायझर केल्या शिवाय प्रवेश देण्यात येत नाही .तसेच वर्गात सोशल डिस्टंगसिंग पाळून बसण्याची व्यवस्था केली आहे. तसेच ज्या मुलांनी सोबत मास्क आणलेले नाहीत त्यांना जागेवरच मास्क उपलब्ध करुन देण्यात येत आहेत