पाचोरा तालुक्यातील काकनबर्डी (ओझर) खंडेराव महाराज यात्रा रद्द पोलीस प्रशासन, महसुल प्रशासनाद्वारे आवाहन

0
774

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस
पाचोरा तालुक्यातील काकनबर्डी (ओझर) खंडेराव महाराज यात्रा रद्द पोलीस प्रशासन, महसुल प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात आला आहे.
पाचोरा पोलीस स्टेशन, दि.06/12/2021
पाचोरा तालुक्यातील तमाम जनतेस याद्वारे आवाहन करण्यात येते की, सालाबादाप्रमाणे काकनबर्डी (ओझर) ता.पाचोरा येथे चंपाशष्ठी ला खंडेराव महाराज यात्रा भरत असते. यावर्षी दि.09/12/2021 रोजी यात्रा उत्सव होता. व सदर यात्रे करीता परीसरातुन तसेच तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. परंतु चालुवर्षी जगभरात तसेच महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असलेने व नवीन ओमायक्रॉन आजाराचा प्रादुर्भाव असल्याने यंदाचा यात्रा उत्वस हा रद्द करण्यात आला आहे. करीता कोणीही काकनबर्डी (ओझर) ता.पाचोरा येथे यात्रे करीता येऊ नये व कोणीही दुकाने लावु नये. व कोणीही गर्दी करु नये. असे यात्रा कमिटी, पोलीस प्रशासन, महसुल प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक पाचोरा पोलीस स्टे जि. जळगांव