पाचोरा भाजपा युवाच्या वतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची केली मागणी

0
876

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
पाचोरा भाजपा युवाच्या वतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याची केली मागणी
पाचोरा येथे भाजपा युवा मोर्च्याच्या माध्यमातून ऊर्जा मंत्री नितीन राऊत याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.मंत्री राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सरकारी पदाचा गैरवापर करून msebcl च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून वाशी,नवी मुंबई येथे msebcl अधिकारी डी. एस.धनगर यांनी कंत्राटदारांची बैठक बोलावून काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऊर्जा मंत्री यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांच्यासाठी नोंदणी करण्याचे निर्देश दिले मंत्री पदाचा गैरवापर करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी त्वरित राजीनामा द्यावा ही मागणी भारतीय जनता युवा मोर्चा पाचोरा तालुक्याच्या वतीने करण्यात आली यावेळी भाजपा शहर सरचिटणीस दिपक माने,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मुकेश  पाटील, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष समाधान  मुळे, तालुका सरचिटणीस विजय नाना पाटील, शहर सरचिटणीस योगेश (भैय्या) ठाकूर, शहर उपाध्यक्ष विरेंद्र चौधरी, उपाध्यक्ष भावेश पटेल, सोहन मोरे, समाधान पाटील व आदि पदाधिकारी उपस्थित होते.