पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

0
951

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान

पाचोरा शहर प्रतिनिधी

पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील शेतकऱ्याची आत्महत्या
आज पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील रहिवासी असलेले समसुद्दिन रज्जाक पिंजारी नामक शेतकऱ्याने कर्ज बाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.  सविस्तर माहिती अशी की स्वतः शेतामधील पिकाच्या माध्यमातून खर्चसुद्धा निघत नसल्याने आणि मागील दोन वर्षापासून सतत झालेल्या पावसामुळे जवळपास  70 टक्के नुकसान झाले असून यामध्ये हातावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांची फार मोठी तारांबळ झाली असून यामध्ये उदरनिर्वाह चालवण्यासाठी विविध ठिकाणाहून उसनवारी करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी यांनी शेवटी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची असल्याची माहिती मिळाली आहे, याबाबत सदर पाचोरा ग्रामीण रुग्णालय यांच्या खबरी वरून  125/21 सी आर पी सी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी पाचोरा पोलीस कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी करत आहेत.