पाचोरा – ओमायक्रॉन या नविन व्हेरिएंटचा संभाव्य धोक लक्षात घेता 18 वर्षावरील सर्व नागारीकांचे लसीकरण पुर्ण करणे आवश्यक कोवीड- 19 लसीकरणाकरीता विशेष शिबीराचे आयोजन पाचोरा शहरातील विविध भागात (नगराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर)

0
647

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि,९/१२/२२१
पाचोरा – ओमायक्रॉन या नविन व्हेरिएंटचा संभाव्य धोक घेता 18 वर्षावरील सर्व नागारीकांचे लसीकरण पुर्ण करणे आवश्यक कोवीड- 19 लसीकरणाकरीता विशेष शिबीराचे आयोजन पाचोरा शहरातील विविध भागात (नगराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले)
पाचोरा:- राज्यामध्ये Multiple Mutation Variant B.1.1.529 (Omicron) या नविन व्हेरिएंटचा संभाव्य धोक घेता 18 वर्षावरील सर्व नागारीकांचे लसीकरण पुर्ण करणे आवश्यक आहे. म. जिल्हाधिकारी सो.जळगांव यांच्या दिनांक 08/12/2021 रोजी दिलेल्या सुचनेनूनसार शहरातील ज्या नागरीकांचा पहीला डोस बाकी असेल व दुसरा डोस प्रस्तावीत असेल अशा नागरीकांकरीता कोवीड- 19 लसीकरणाकरीता कृती आराखडा तयार करुन विशेष शिबीराचे आयोजन शहरातील विविध भागात दिनांक 10/12/2021 ते दिनांक 11/12/2021 असे दोन दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपावेतो करण्यात आलेले आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे.
दिनांक 10/12/2021 रोजी सकाळी 9 ते रात्री 9
ठिकाणे (1) NUHM, बाहेरपुरा (2) ग्रामीण रुग्णालय (3) सु. भा. पाटील, विद्या मंदिर, देशमुखवाडी, पाचोरा (4) डी.एम. पाटील शाळा त्रंबक नगर (5) शिव मंदिर, सिंधी कॉलनी (6) जि.प.शाळा शिवाजी नगर जारगांव चौफुली (7) गणेश
मंदिर, MIDC कॉलनी
11/12/2021  दिनांक 10/12/2021 रोजी सकाळी 9 ते रात्री 9
ठिकाणे (1) NUHM, बाहेरपुरा (2) ग्रामीण रुग्णालय (3) अंगणवाडी, त्रंबक नगर (4) मिठाबाई कन्याशाळा (5) शिवतिर्थ, भडगांवरोड (6) तलाठी कॉलनी, साई मंदिर (7) आदर्श नगर संजय गोसावी यांचे घराजवळ
तरी शहरातील सर्व लोकप्रतिनिधी स. सदस्य, न.पा.पाचोरा, सामाजीक संस्था, प्रतिष्ठित नागरीक, धर्मगुरु, सामाजीक कायकत्रे यांनी वरील प्रमाणे नमुद ठिकाणी नागरीकांना उपस्थित राहणेकामी प्रोत्साहीत करावे व जास्तीत जास्त लसीकरणाचे उध्दीष्ट पुर्ण होणेकामी सहकार्य करावे असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले आहे.