आरोग्यदुत न्युज चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी) दि,१२/१२/२०२१
समाजसेविकाकु. वृषाली राजेंद्र महाजनयांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर
सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त समाजसेविका कु. वृषाली राजेंद्र महाजन यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२१ गुरुवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे. माणुसकी चा पाचवा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा- सकाळी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी एक जळगाव जिल्ह्यातील कु. वृषाली महाजन यांना समाजसेवेतील सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्या शिवविचार युवराणरागिणी निर्माण राज्यस्तरीय व्हाट्सअँप ग्रुप च्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आहेत ह्या माध्यमातून समाजातील गरीब-गरजू मोफत ब्लड मिळवून देणे,तसेच रुग्णांना मोफत उपचार कोठे मिळतील त्यासाठी काय कराव लागेल या बाबतचे मार्गदर्शन, शासकीय योजणांचा लाभ कसा घेता येईल याबाबतचे मार्गदर्शन,मेडिकल विभागात कायम आपल्या ओळखीचा लोकांना फायदा करून देत आजोबा आणि वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सहकारी व मित्र परिवार सोबत घेवून रुग्णसेवक म्हणून सेवा करत असतात. आपल्या कार्यात अग्रेसर असतात अशा या कर्तुत्ववान व पेशाने शिक्षिका असलेल्या परंतु समाजसेवेचा ध्यासअंगी घेतलेल्या समजेविका कु.वृषाली राजेंद्र महाजन यांचा माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल कु. वृषाली राजेंद्र महाजन यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.