कोंग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य व देशाच्या आयर्न लेडी म्हणून ओळखले जाणार्या स्वतंत्र भारताच्या पहील्या महीला पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त गरीबांना जेवणाचे फुड पाकीट वाटप करण्यात आली. जळगांव जिल्हा सोशल मीडिया व आरोग्य सेवा सेलयांच्या संयुक्त विद्यमाने स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने गरीबांना जेवणाचे फुड पाकीट व केळी वाटप कॉग्रेस चे जेष्ठ नेते प्रदीप पवार,जळगाव जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले करण्यात आले. या कार्यक्रमात सेवा दल चे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भडगाव शहर अध्यक्ष दिलीप शिरुडे महीला कॉग्रेस च्या संगिता नेवे, अड. मनिषा पवार, शिवराम पाटील, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शहर अध्यक्ष राहुल शिंदे, मुकेश पाटील, गणेश पाटील, सोनु पुजारी, समाधान ढाकरे, बंटी सोनवणे आदी उपस्थित होते.