दिनांक 3 आणि 4 जानेवारी रोजी होणार इतिहास संकलन संस्थेचे प्रथम अधिवेशन,

0
535

आरोग्यदुत न्युज

रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – 15 डिसेंबर, 2021
 दिनांक 3 आणि 4 जानेवारी रोजी होणार इतिहास संकलन संस्थेचे प्रथम अधिवेशन,
अखिल भारतीय इतिहास संकलन योजना न्यु दिल्लीशी सलग्नित इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत ही एक इतिहास क्षेत्रात काम  करणारी एक अग्रगण्य संस्था आहे,संस्थेच्या माध्यमातून प्रबोधन, संकलन, संवर्धन,जतन व संशोधन असे बहू अंगी काम करीत आहे  गेल्या तीन वर्षांपासून संघटनेने महाराष्ट्र स्तरावर अनेक उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी केले आहेत या संघटनेचे पहिले अधिवेशन हे  3 आणि 4 जानेवारी 2022 रोजी आष्टी येथील अँड.बी.डी. हंबर्डे महाविद्यालयात संपन्न होत आहे या  कार्यक्रमास राष्ट्रीय सघटन मंत्री  मा डाँ. बालमुकुंदजी पांडे,आय सी एच आर चे अध्यक्ष मा डाँ.अरविंदजी जामखेडकर,आय सी एच आर चे उपाध्यक्ष मा डाँ.ओमजी उपाध्याय,राष्ट्रीय उपाध्यक्ष डाँ शरद हेबाळकर,पश्चिमप्रांत अध्यक्ष डाँ.गो.भ.देगलुरकर, राष्ट्रीय महिला प्रमुख श्रीमती अनुराधा ताई राजहंस, जेष्ठ अभ्यासक अरुणचंद पाठक पुणे, प्रदीप म्हैसेकर संभाजीनगर,डाँ. नरसिंग परदेशी जळगाव, डाँ.शिवकुमार पाटील पैठण डाँ.संतोष बनसोड,डाँ गजमल शहा डाँ.मंजिरी भालेराव आदी इतिहास क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे, एका अर्थाने हे अधिवेशन म्हणजे इतिहास अभ्यासकांची मांदियाळी ठरणार आहे, प्रस्तुत अधिवेशनात    इतिहासाच्या पूर्नलेखनाची  गरज,त्यात आधुनिक प्राचीन आणि मध्ययुगीन, इतिहासातिल आव्हाने आणि आमची जबाबदारी,आणि इतिहास संकलन संस्था काल आज आणि उद्या या विषयावर चर्चासत्र होणार आहे,तसेच शासनाने ग्रामीण इतिहासावर।लक्ष केंद्रित करावे, छत्रपतींचा इतिहास ठळकपणे अभ्यासक्रमात समाविष्ट करावा आणि शहराचे नामकरण व्हावे असे तीन प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत,या अधिवेशनात इतिहास संकलन संस्थेची आमसभा, आयामश: बैठका,महिला विभाग  ,युवा विभाग ,, इतिहास विषयात व्याख्यान, संगोष्टी,अभ्यास दालन, विविध प्रकारची प्रदर्शने, विविध प्रकारचे पुस्तकाचे स्टॉल,असे विविध उपक्रम आयोजित होणार आहे तसेच मनोरंजनासाठी कविसम्मेलन, हलगी सम्बल जुगलबंदी असे विविध कार्यक्रम होणार आहेत, या अधिवेशनात संघटनात्मक देवगिरी प्रांत, कोकण प्रांत,पश्चिम प्रांत,आणि विदर्भ प्रांत उपस्थित रहाणार आहेत, या साठी प्रवास रचना सुरू आहे ,महाराष्ट्रातल्या तमाम इतिहास प्रेमींनी या अधिवेशनात उपस्थित राहावे अशीही रचना सुरू आहे यासाठी सर्व प्रांत कार्यकारीणी,पदाधिकारी,जिल्हा    तालुका व गावागावात संकलनाचे कार्य सुरु आहे  अशी माहिती  इतिहास संकलन संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक रवींद्र पाटील यांनी दिली