पाचोरा येथील श्री गो से हायस्कूलचे शिक्षक-शिक्षीकांचा लसीकरण शोध मोहीमेत सहभाग

0
893

आरोग्यदुत न्युज*

*रईस बागवान*
*पाचोरा शहर प्रतिनिधी*
दिनांक – 15 डिसेंबर, 2021
पाचोरा येथील श्री गो से हायस्कूलचे शिक्षक-शिक्षीकांचा लसीकरण शोध मोहीमेत सहभाग
पाचोरा- सध्या पाचोरा नगरपालिका प्रशासनातील आरोग्य विभाग यांच्या आदेशानुसार लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची घरोघरी जाऊन नागरिकांची विचारपूस करून कोरोना लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे.
    त्यासाठी सर्वे करण्यात येत आहे या शोधमोहीमेत प्रभाग क्रमांक एक मधील हनुमान वाडी नागसेन नगर थेपडे नगर आशीर्वाद ड्रीम सिटी रेणुका कॉलनी मिलिंद नगर प्रभाग क्रमांक एक मधील सर्व भाग व तेथील नागरिकांचा कोरोना लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांची माहिती घेऊन जनजागृती करण्यासाठी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा न.पा.सभागृहीतील राष्ट्र काँग्रेसचे गट नेते नानासो. संजय वाघ, संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या आदेशानुसार पाचोरा श्री गो से हायस्कुल मधील सकाळ – दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी यांनी वरील परिसरातील घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस बाकी असलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम शिक्षक-शिक्षीकावृंद करीत आहे
   यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटीलसर उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघमॅडम पर्यवेक्षक एन आर पाटीलसर आर एल पाटीलसर ए बी अहिरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक बंधू-भगिनी काम पाहत आहेत यामुळे नागरिकांमध्ये रहिवाशांमध्ये जनजागृतीचे काम सुरू असुन लवकरात लवकर हा प्रभाग लसीकरण मुक्त होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत