नांद्रा जि प शाळेतील विद्यार्थ्यांचा किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
238

आरोग्यदुत न्युज
किरण सोनार नांद्रा (प्रतिनिधी)
दि,१६/१२/२०२१
नांद्रा जि प शाळेतील विद्यार्थ्यांचा किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नांद्रा तालुका पाचोरा येथील मंथन ग्रुप आयोजित स्वर्गीय शालिक राठोड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री स्वप्नील बाविस्कर यांच्या संकल्पनेतून जि प प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मोहिनी पाटील व सौ प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता तिसरी व चौथी या वर्गातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांच्या भव्यदिव्य आकर्षक व डोळ्यांचे पारणे फेडणारी ही कलाकृती सादर केल्या व छत्रपती शिवरायांवरील श्रद्धा प्रकट केली . या लहान वयात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा , समजावा म्हणून ही संकल्पना राबवली . दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना आपापल्या परीने शक्य होईल तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बनवण्यास प्रोत्साहन दिले व त्यानुसार लहान मुलांनी कल्पकतेने किल्ले बनवले. नंतर जि .प .शाळा नांद्रा येथे या किल्ल्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले.
प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी नांद्रा गावाचे सरपंच ताई सो आशाताई तावडे यांनी फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या उद्घाटन प्रसंगी उपसरपंच शिवाजी तावडे, विनोद तावडे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्निल बाविस्कर ,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गणेश सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य योगेश सूर्यवंशी, निर्मला पिंपळे ,सुभाष तावड़े,किशोर खैरनार ,हिरालाल सूर्यवंशी ,संदीप पाटील, व ग्रामसेविका अनिता सपकाळे माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण भाऊ सोनार , ईश्वर सातपुते ,मुख्याध्यापक मोहिनी पाटील हे उपस्थित होते. स्पर्धा चुरशीची असल्याने यावेळेस परीक्षक म्हणून मोहन पाटील, पुष्पाताई बाविस्कर ,संदीप पाटील ,ज्ञानेश्वर सोनवणे मोहन पाटील, यांनी विद्यार्थ्यांना गुण दिले . या या प्रदर्शनाला प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री समाधान पाटील व केंद्रप्रमुख अनिल जाधव यांनी भेट देऊन शाळेचे व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या व बक्षीसही दिले. या स्पर्धा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ मोहिनी पाटील, सौ प्रतिभा पाटील ,सौ स्मृती साबलेसौ स्वाती पाटील, व सौ उर्मिला पाटील, यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेनंतर सर्व शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थी या सर्वांचे परिसरातून कौतुक होत आहे.