वडजी विद्यालयाचा निसर्ग रम्य स्काऊट कॅम्प प्राचार्य डी. डी. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.

0
433

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,१७/१२/२०२१
वडजी विद्यालयाचा निसर्ग रम्य स्काऊट कॅम्प प्राचार्य डी. डी. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला.
भडगाव  कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी. आर. पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम व कनिष्ठ विज्ञान महाविदयालयाचा स्काऊट कॅम्प पिर गैबनशाहवली दर्गा  निसर्ग परीसराच्या सानिध्यात मुख्या. प्राचार्य डी. डी. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला. प्रत्येक वर्गांचे विद्यार्थी-विद्यार्थीर्नीचे वेगवेगळे स्वतंत्र गृपनुसार स्वतः स्वयंपाकाचे नियोजन केले. वेगवेगळे मेनू पदार्थ  बनविले. तीन दगडांच्या चुलीवर विविध पक्वान्न स्वतः बनविण्याचा आनंद घेतला. वरणभात, पुरी, पोळी, भाकरी, पावभाजी, खिचडी, पनीर, भाजी, मठ भाजी, बटाटे भाजी, मिरची भाजी, वाटाणे भाजी, गुलाबजाम असे विविध पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः बनविले. निसर्गरम्य वातावरणात सर्वांनी वनभोजनाचा आनंदास्वाद घेतला. स्काऊट कॅम्पीग विषयी वचन, गिते, ध्येय, याबाबत मा. प्र. मुख्याध्यापक बी. वाय. पाटील, जेष्ठ शिक्षक ई. एम. पाटील, डी. एम. पाटील यांनी माहिती दिली. सामुहिक स्काऊट प्रार्थना, स्काऊट गितांनी कार्यक्रमात रंगत आली. सहशालेय समिती प्रमुख एस. जे. पाटील, नियोजन समिती अध्यक्ष जे. एच. पवार सह सर्व वर्ग शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सहकारी कर्मचारी, स्काऊट मास्टर, लिडर यांनी यशस्वी नियोजन केले. सूत्रसंचालन वाय. ए. पाटील, आभार एम. एस. देसले, समारोप आर. एम. पाटील यांनी केला. संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, सचिव डॉ. पूनम पाटील, संचालक मंत्रालय सचिव प्रशांतराव पाटील, संचालिका कोकिळाताई पाटील, जिजाताई पाटील, मा. नगराध्यक्ष श्यामकांत भोसले, अभियंता राहुल पाटील, मा. सभापती मनीषा पाटील, नगरसेविका योजना पाटील यांनी कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्ताराधिकारी गणेश पाटील,  केंद्रप्रमुख़ संजय न्याहिदे, रविंद्र सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.