पाचोरा कॉंग्रेस ने.दिल्या न. पा. ला शेकडो हरकती  :माफी चा ठराव करा :सचिन सोमवंशी

0
762

आरोग्यदुत न्युज*

रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – 18 डिसेंबर, 2021
पाचोरा कॉंग्रेस ने.दिल्या न. पा. ला शेकडो हरकती  :माफी चा ठराव करा :सचिन सोमवंशी
पाचोरा –  येथील घरपट्टी विरोधात कॉंग्रेस ने आक्रमक भूमिका घेतली असून सत्ताधारींनी केलेला ठरावच माफी चा करुन नागरिकांना हरकतीसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करत आलेल्या शेकडो हरकती  न. पा. कडे देण्यात आल्या
पाचोरा नगर परिषद ने घरपट्टी मध्ये वाढ करण्यात यावी असा ठराव केला असून शासनाच्या नियमानुसार दर चार वर्षांनी हा ठराव करावा लागतो असे उत्तर न. पा. प्रशासन देऊन दिशाभूल करीत आहेत. जर नागरिकांच्या हितासाठी नगरसेवक आहेत तर त्यांनी शासनाला कोरोना महामारीमुळे शहरातील सर्वच लहान मोठे व्यापार बंद होते त्यामुळे पाचोरा शहरातील नागरिकांना तात्काळ आहे त्या घरपट्टी मध्ये पन्नास टक्के सुट द्यावी अशी मागणी चा ठराव नागरिकांच्या हितासाठी का केला नाही असा प्रश्न कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी उपस्थित केला आहे.  ज्या नोटीसा न. पा. अधिनियम प्रमाणे बजावल्या आहेत त्या पोहचल्या सुध्दा नाही त्यामुळे नागरिकांनी हरकती व सूचना करण्यासाठी योग्य वेळ मिळाला नाही तो तात्काळ देण्यात यावा म्हणून हरकती साठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन आणि शहरातील नागरिकांनी कॉंग्रेस कडे दिलेल्या हरकती न. पा. च्या मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांच्याकडे कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड अंबादास गिरी, अल्पसंख्यक जिल्हा सचिव इरफान मनियार, कॉंग्रेस जेष्ठ रविंद्र नेवे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले आदींच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी निवेदना सोबतच नागरिकांनी दिलेल्या हरकती देखील देण्यात आल्या. लवकर जळगाव येथील रचनाकार राजेश पाटील याच्यावर अपिल सुनावणी घेणार असुन नागरिकांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी त्यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या कडुन  करण्यात आले आहे. हा लढा आम्ही सुरुच ठेवणार असुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदन सह पोस्ट कार्ड पाठवुन आहे त्या टॅक्स मध्ये पन्नास टक्के सुट द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. भविष्यात शहरातील नागरिकांनी या लढ्यात सामिल व्हावे असे आवाहन कॉंग्रेस कडुन केले आहे.