पंधरा माध्यमिक शाळा व तीन कनिष्ठ महाविद्यालयातून नांद्रा येथील आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश.

0
1814

आरोग्यदुत न्युज
किरण सोनार नांद्रा (प्रतिनिधी)
दि,२०/१२/२०२१
शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी तसेच आचार्य गजाननराव गरुड प्रतिष्ठान तर्फे भव्य कॉमनवेल्थ गेम ची चॅम्पियनशिप मध्ये नांद्रा येथील आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश
शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी तसेच आचार्य गजाननराव गरुड प्रतिष्ठान तर्फे भव्य कॉमनवेल्थ गेम ची चॅम्पियनशिप स्पर्धा बनवण्यात आली होती. त्या निमित्ताने शेंदुर्णी येथे पंधरा माध्यमिक शाळा व तीन कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण 844 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता यासहभागांमध्ये या स्पर्धेतील नांद्रा येथील आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय यांनी प्रथम विजेतेपद पटकावले आहे त्यामध्ये जनरल चंपियनशिप मध्ये रनिंग, गोळा फेक, थाळी, रिले, इत्यादी स्पर्धेमध्ये 9 गोल्ड मेडल व 13 सिल्वर मेडल व 23 काॅस्यपदक विजेते नांद्रा येथील आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयाने पटकावले
या भव्य कॉमनवेल्थ गेम ची चॅम्पियनशिपमध्ये नांद्रा येथील आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस चौधरीसर क्रीडाशिक्षक एस आर निकम सर, अविनाश निकम सर ,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व सी एस पाटील सर ,जी एस ठाकूर, सर एसबी नाईकसर , व्ही एस पाटील मॅडम यांचे अनमोल सहकार्य लाभले या विजेता विद्यार्थ्यांचे येणाऱ्या दिवसात भव्य रॅली काढून सर्व स्पर्धकांचा नागरी सत्कार करण्याचे आप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय यांनी ठरविले आहे. या स्पर्धेत विजेते झाल्याबद्दल पंचक्रोशीतील सर्व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या विद्यार्थ्यांचा सर्व स्तरातून पालक वर्गातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.