राज्य सेवा पूर्व परीक्षा केंद्र परिसरात फक्त परीक्षार्थींनाच मिळणार प्रवेश जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश

0
560

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दिनांक – 22 डिसेंबर, 2021

राज्य सेवा पूर्व परीक्षा केंद्र परिसरात

फक्त परीक्षार्थींनाच मिळणार प्रवेश
जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश
जळगाव, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पुर्व परीक्षा 2021 जळगाव  शहरातील एकूण 19 उपकेंद्रावर 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12  व दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फक्त परीक्षार्थींनाच प्रवेश राहील, अशा आशयाचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, की  या परीक्षेच्या वेळी गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
या परीक्षा केंद्राचे ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, खबरदारीचे उपाय म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (1) व (3) नुसार मिळालेल्या अधिकारानुसार पुढील प्रमाणे आदेश देत आहे. त्यानुसार दोन जानेवारी 2021 रोजी पेपर सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जळगाव शहरातील एकूण 19 उपकेंद्राचे 100 मीटर परिसरात कोणी ही प्रवेश करु नये. सदर आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासाठी लागू होणार नाही. परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन / एस.टी.डी/ आय.एस.डी/ फॅक्स केंद्र/ झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनिक्षेपक पेपर सुरु असलेल्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.