आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दिनांक:- २४/१२/२०२१
वडजी टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात स्वर्गीय साधनाताई पाटील पुण्यस्मरणार्थ साधनाई टॅलेंट सर्च परीक्षा व निबंध स्पर्धा संपन्न
भडगाव कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी. आर. पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात स्वर्गीय साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ प्रतिमापूजन माल्यार्पण मुख्या. प्राचार्य डी. डी. पाटील यांचे हस्ते मा. मुख्याध्यापक तथा मा. सरपंच बी. वाय. पाटील, शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख एस. जे. पाटील, पो. पा. प्राचार्य के. ए. मोरे सह सर्व समिती प्रमुख़, सदस्य, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सहकारी कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचे उपस्थितित करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षा संदर्भात माहिती व सराव व्हावा या उद्देशाने साधनाई टॅलेंट सर्च परीक्षा 2021 दोन गटात आयोजित करण्यात आली. पहिल्या गटात 5 वी ते 7 वी, दुसऱ्या गटात 8 वी ते 11 वी गटात 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सांस्कृतिक समिती आयोजित आई विषयावर आधारित निबंध स्पर्धेत 70 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. साधनाई टॅलेंट सर्च परीक्षा प्रमुख जे. एच. पवार सह सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी यशस्वी नियोजन केले. जिल्हास्तरिय निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्याना गौरविण्यात आले. स्वर्गीय सुवर्णाताई राजेंद्रसिंग राजपूत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हास्तरिय निबंथ स्पर्धेत विद्यालयाची विद्यार्थीनी सृष्टी प्रमोद पाटील हिचा तृतीय क्रमांक ट्रॉफी, रोख ५०० रुपये बक्षीस प्रदान करून गौरव करण्यात आला. तसेच चेतना परदेशी, मानसी परदेशी, भाग्यश्री पाटील, गणेश नेरपगार, अश्विनी न्हावी, जयश्री पाटील, ऋतूजा न्हावी, धनश्री बच्छाव, गायत्री बोरसे या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील, सचिव तथा जिल्हा दूध संचालिका डॉ. पूनमताई पाटील, संचालक तथा मंत्रालय सचिव प्रशांतराव पाटील, संचालक मा. नगराध्यक्ष श्यामकांत भोसले, संचालक इंजि. राहुल पाटील, संचालिका कोकीलाताई पाटील संचालिका जिजाताई पाटील, मा. सभापती मनीषा पाटील, नगरसेविका योजना पाटील, गट शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्ताराधिकारी गणेश पाटील, केंद्रप्रमुख संजय न्याहिदे, रविंद्र सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन आर. एम. पाटील, आभार वाय. ए. पाटील, समारोप एम. एस. देसले यांनी केला.
Home Uncategorized वडजी टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात स्वर्गीय साधनाताई...