पाचोरा – भडगाव रोडवरील अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार तर एक जखमी.

0
318

आरोग्यदुत न्युज

रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – २४ डिसेंबर, 2021
पाचोरा – भडगाव रोडवरील अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार  तर एक जखमी. या घटनेची वार्ता शहरात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे
शहरातील बायपास वरुन जाणारा हायवे रोड जेवढा सोयीचा तितकाच मृत्यू चा सापळा झाला असून मृत्यू ची शृंखला या रस्त्यावर झाली आहे. आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गाडगेबाबा नगर परीसरात मिस्तरी काम करुन मयत नईम खान युनुस खान (२४) हा आपल्या मोटरसायकलवर घराकडे जात असताना रेल्वे पुलाकडन भडगाव कडे जाणार्‍या वाहनाने जोरदार धडक दिली यात युनुस हा जागीच ठार झाला तर त्याच्या सोबत तालुक्यातील जोगेतांडा येधील बिगारी संतोष हेमराज चव्हाण (२१) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला येथील एका हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. मयत हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा खंदा कार्यकर्ता होता ही बातमी कळताच कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, अल्पसंख्यक जिल्हा सचिव इरफान मनियार आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली यावेळी सचिन सोमवंशी यांनी दुःख व्यक्त करत येणाऱ्या २९ डीसेंबर च्या पाचोरा तालुका मेळाव्यात नईम खान यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार होते. मयत नईम खान यांस एक लहान मुलगी आहे बाहेर पुरा भागातील असंख्य लोक ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते