पत्रकार किशोर देहाडे यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमाने साजरा.

0
814

आरोग्यदुत न्युज

युवराज राजपुरे

नाशिक जिल्हा (प्रतिनिधी)
दि. 27 डिसेंबर 2021

पत्रकार किशोर देहाडे यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमाने साजरा.
नव वर्षाच्या पुर्व संध्येला नाताळाच्या पवित्र सनाच्या दिवशी जन्म झालेल्या इगतपुरी तालुक्यातील डॅशींग पत्रकार तसेच प्रबंधभूमी महाराष्ट्रन्यूज चे इगतपुरी तालुका विभागीय संपादक त्याच प्रमाणे इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष किशोर देहाडे. आज इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने घोटी व इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत रुग्णालयात रुग्णाना फळवाटपाचा कार्यक्रम करून इगतपुरीतील ब्रिटिश कालीन रेल्वे तलावा जवळ डोंगराळ भागात निसर्गाच्या सान्निध्यात उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान इगतपुरी तालुक्यात व शहरात सर्वांना हवेहवेसे वाटणारे कोणाच्या ही मदती साठी तत्पर धाऊन जातात त्यांच्या या तत्परते मुळे त्यांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण केले आहे.याच अनुषंगाने श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बालगोपाळांनी किशोर भाऊंचा मोठ्या आदराने वाढदिवस साजरा करत आनंद व्यक्त केला.
या प्रसंगी जनसेवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष किरण फलटणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इगतपुरी शहराध्यक्ष वसिम सय्यद यांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप करून किशोर देहाडे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या आनंदमय दिनी इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते त्याच प्रमाणे श्रमजीवी संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा निताताई गावंडा आदींनी अभिष्टचिंतन कार्यक्रमाला उपस्थित राहुन किशोर देहाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व केलेल्या कामांचे कौतुक करण्यात आले.