आरोग्यदुत न्युज
युवराज राजपुरे
नाशिक जिल्हा (प्रतिनिधी)
दि. 27 डिसेंबर 2021
मुंबईला निघालेल्या एकनाथ खडसेंनी नाशिकहूनच वळवली गाडी
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर २७ रोजी रात्री हल्ला झाला. त्या कारमधून जात असताना मोटरसायकलस्वार अज्ञातांनी हल्ला करून कारची काच फोडत गाडीचे इतर नुकसान करुन पळ काढल्याची घटना सोमवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास तालुक्यातील माणेगाव ते कोथळी दरम्यान घडली. सुदैवाने या प्राणघातक हल्ल्यात त्यांना काहीही इजा झाली नाही.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जिल्हा बॅंकेच्या विद्यामान संचालिका तथा राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे या चांगदेव येथील हळदीचा कार्यक्रम आटोपून मुक्ताईनगरकडे घरी परत येत असताना माणेगाव फाट्यावर अज्ञात मोटरसायकल स्वारांनी त्यांच्या वाहनावर ( एमएच १९/ सी सी १९१९ र समोरून हल्ला केला. गाडीवर रॉडने वार केल्याचे सांगितले जात आहे. यात वाहनाचा दर्शनी काच फुटला आहे. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून अधिक माहिती घेत आहे. दरम्यान, रोहिणी खडसे ज्या बाजूने वाहनात दर्शनी बाजूला बसल्या होत्या, त्याच बाजुचा काच फुटला आहे. सुदैवाने रोहिणी खडसे व ड्रायव्हर या हल्ल्यातून सुखरूप बचावले आहेत. रात्री उशिरा पर्यंत याबाबत घटनास्थळी तपासकार्य सुरू होते.
रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी समर्थकांची गर्दी ही घटना घडल्यानंतर रोहिणी खडसे या आपल्या घरी पोहचल्या असता लगेचच समर्थकांनी एकच गर्दी केली. प्रशासन व सरकार त्यांचे काम करेल, कार्यकर्त्यांनी शांतता पाळावी, असे आवाहन कोलते यांनी केले. दरम्यान एकनाथ खडसे हे मुंबईला जात असताना घटना कळताच नाशिक येथून परतले.