इगतपुरी तालुक्यतील कसारा घाटात भिषण अपघात कंटेनरने दिली दुचाकीला धडक मोटारसायकल स्वार जखमी सुदैवाने जीवितहानी नाही.

0
1645

आरोग्यदुत न्युज

युवराज राजपुरे

नाशिक जिल्हा (प्रतिनिधी)
दि. 28 डिसेंबर 2021

सविस्तर वृत्त असे कि आज दि. २८/१२/२०२१ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास मुंबई कडू नाशिक दिशेने जाणारा कंटेनर क्रं.TN01AP1747 ने नाशिक येथील चैतन्य नगर नाशिक रोड, येथील रहिवाशी असलेले नविन कुमार शिंदे हे मोटारसायकल क्रं MH15DZ0463 वरून आपल्या गावी नाशिकला जात असताना त्यांचा कसारा घाटात अपघात झाला, या अपघातात नाविनकुमार चंद्रकांत शिंदे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना 108 रुग्णवाहिका चालक व डॉ अश्पाक खान यांनी जखमींना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून तेथील यांनी प्रथमउपचार करून जखमींना नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे.