गोंदे दूमाला ते विश्रामगड भव्य दिव्य छञपती शिवाजी महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन.नविन वर्षानिमित्त ग्रामस्थांकडून आगळावेगळा सोहळा.

0
581

आरोग्यदुत न्युज

युवराज राजपुरे

नाशिक जिल्हा (प्रतिनिधी)
दि. 29 डिसेंबर 2021

 गोंदे दूमाला ते विश्रामगड भव्य दिव्य छञपती शिवाजी महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन.- नववर्षानिमित्त ग्रामस्थांकडून आगळावेगळा सोहळा.
  (गोंदे दुमाला. ईगतपुरी) महाराष्ट्रात नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या व विविध कार्यक्रमांचे आयोजन करत करण्यात येते. परंतू नेहमीच वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे शिवभक्तांच्या वतीने गोंदे दुमाला ते विश्रामगड येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्य पालखीचे परिसरातील गावांतुन स्वागत करत पालखी विश्रामगड येथे पोहोचणार असून या भव्य दिव्य पालखी सोहळ्यामध्ये तालुक्यातील शिवभक्तांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा असे आवाहन पालखी सोहळ्याचे आयोजक रूपेश नाठे यांनी केले आहे.
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे १ जानेवारी २०२२ रोजी गोंदे दुमाला ते विश्रामगड येथे भव्य दिव्य स्वरुपात वाद्यांच्या गजरात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात येणार असून यानंतर शिवपुतळ्याते पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सदर पालखीच्या मार्गक्रमणाला वाद्यांच्या गजरात गोंदे दुमाला येथील भवानी माता मंदिरापासून सुर्वात करण्यात येणार आहे. त्यानंतर पालखीचे पुढे पाडळी देशमुख, मुंढेगाव, कांदडवाडी फाटा, जानोरी, अस्वली, नांदगाव बुद्रुक, साकूरफाटा, कवडदरा, धामणगाव, अडसरे, टाकेद, यानंतर विश्रामगड येथे पोहोचणार आहे. या भव्य दिव्य पालखी सोहळ्यात जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यातील शिवभक्त उपस्थित राहणार असून शेवटी पालखीचे गोंदे दुमाला येथे आगमन झाल्यानंतर प्रसिद्ध शिवव्याख्याते यांचे व्याख्यान होणार असून इतरही मान्यवरांची शिवविचारांवर भाषणे होणार आहे. तरी तालुक्यातील व परिसरातील सर्व शिवभक्तांनी या भव्य दिव्य पालखी सोहळ्यात उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा असे आवाहन आयोजक रूपेश नाठे यांनी केले आहे.
या पालखी सोहळ्यासाठी शिवस्वराज्य संस्था, जय भवानी ग्रुप, कळसूबाई मित्र मंडळ, कर्मयोगी प्रतिष्ठान, देवा ग्रुप, राजयोग प्रतिष्ठाण, भूमिपूत्र फाऊंडेशन, सह्याद्री रानवाटा ग्रुप, जय हो ग्रुप, छावा संघटना, सरपंच सेवा संघटना, सह्याद्री प्रतिष्ठान, आदींसह परिसरातील शिवभक्तांचे सहकार्य लाभणार आहे.