पाचोरा येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा कार्यकाळ संपृष्ठात आल्याने नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा नगरसेवकांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

0
904

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि. २९ डिसेंबर २०२१
पाचोरा येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा कार्यकाळ दि. २९ डिसेंबर २०२१ रोजी संपृष्ठात आल्याने नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा नगरसेवकांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दि. २९ डिसेंबर रोजी नगरपरिषदेची विशेष सभा आयोजीत करण्यात आलेली होती विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर नगरपालिकेच्या सभागृहात कोवीड – १९ नियमांचे पालन करुन छोटेखानी सत्कार समारंभा आयोजीत करण्यात आलेला होता.
  यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक विकास पाटील आदींची आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना अध्यक्ष संजय गोहील यांनी गेल्या ५ वर्षात नगरपरिषद प्रशासन व सहकार्य नगरसेवकांनी जे सहकार्य केले तसेच आमदार किशोर पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी रुणी असल्याचे सांगीतले. मुख्याधिकारी यांनी संपुर्ण सभागृहाचे गेल्या ५ वर्षात प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. माजी उपनगराध्यक्ष यांनी सभागृहाचे आभार मानत अशा प्रकारे पहिल्यांदाच सत्कार होत असल्याने प्रशासनाचे देखील आभार मानले तसेच मागील ५ वर्ष खेळीमेळीच्या वातावरणात कार्यकाळ पुर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी उपनगराध्यक्षा प्रियंका वाल्मिक पाटील, नगरसेवक अशोक मोरे, सतिष चेडे, हर्षाली जडे, वासूदेव माळी, संगिता पगारे, मनिष भोसले, महेश सोमवंशी, रंजना भोसले, मालती बापु हटकर, राम केसवाणी, निलीमा पाटील, शेख बशीर शेख मोहम्मद बागवान, उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, अभियंता ईश्वर सोनवणे, हिमांशू जैस्वाल, लेखापाल दत्तात्रय जाधव, सभा लिपीक राजेंद्र शिंपी, लिपीक ललित सोनार, किशोर मराठे, राकेश मिश्रा, संदिप जगताप, आकाश खैरनार, महेंद्र गायकवाड आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.