नाशिक, इगतपुरी तालुक्यातील कामगारांची फसवणूक ? कामगारांचे बेमुदत उपोषण.

0
589

आरोग्यदुत न्युज

युवराज राजपुरे

नाशिक जिल्हा (प्रतिनिधी)
दि. 29 डिसेंबर 2021

नाशिक, इगतपुरी तालुक्यातील कामगारांची फसवणूक ? कामगारांचे बेमुदत उपोषण.करोना चे नियम पाळुन ही उपोषण
युवराज राजपुरे .नाशिक
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील नामांकित कंपनी जिंदाल पॉलिफिल्म्स प्रा.लि. मुंढेगाव, ता. इगतपुरी, जि.नाशि. या कंपनी मध्ये स्थानिक भूमीपुत्रांना प्रशासनाने कुठलेही कारण न सांगता कामावरून काढून टाकले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जिंदाल पॉलिफिल्म्स प्रा.लि. मुंढेगाव, ता. इगतपुरी, जि.नाशिक. येथील कार्यरत असलेले कामगारांपैकी बरेच कामगार हे बाहेरून आणण्यात आलेले आहेत, यापैकी बरेचसे असे कामगार आहेत कि, त्यांनी कुठल्याही प्रकारची “पोलीस चरित्र पडताळणी (NOC) न करता येथे काम करत आहेत. परंतु मुंढेगाव येथील २५ कामगारांना कोणतेही कारण न सांगता कंपनी प्रशासनाने कामावरून काढून टाकलेले होते. त्यापैकी १० कामगारांनी उपोषण करून   कंपनी प्रशासनाने कामावर घेतले परंतु राहिलेल्या १५ कामगारांना १ महिन्यात कामावर घेऊ असे कंपनीने आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्या १५ मुलांना कामावर घेतलेले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरत चाललेले आहे. या अगोदर येथील कामगारांनी दि.१२/०९/२०२० व दि. १४/१२/२०२० उपायुक्त कार्यालय येथे मिटिंग होऊन या स्थानिक कामगारांना दि.०१/०२/२०२१ रोजी कामावर घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे मुंढेगाव येथील १५ मुलांना कामावर घेण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी दि. २७/१२/२०२१ रोजी जिंदाल कंपनी गेट समोर मा. आमदार हिरामण खोसकर साहेब, जि.प,सदस्य जया भाऊ जाधव, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम भाऊ वारघडे, भूमिपुत्र फाउंडेशन चे विनोद भाऊ नाठे, मुंढेगाव ग्रामपंचायत, आणि इतर सर्व कामगार यांच्या मार्गदर्शनाखाली जिंदाल पॉली फिल्म कंपनीने जे स्थानिक १५ भूमीपुत्रांची फसवणूक केली आहेत याबाबत निषेध म्हणून सोमवार दि.२७/१२/२०२१ पासून जोपर्यंत कंपनी १५ कामगारांना कामावर घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरु केले आहेत.