निधन वार्ता आपणास कळविण्यात अंत्यत दुःख होत आहे की, जावेद शेख यांचे आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

0
1221

 

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
निधन वार्ता
आपणास कळविण्यात अंत्यत दुःख होत आहे की, जावेद शेख वय ३४
उद्या सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा
पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागातील रसूल नगर भागातील शिवसेनेचे अल्पसंख्यांक आघाडी सेलचे माजी जिल्हा उपाध्यक्ष जावेद शेख वय ३४ यांचे आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दि ३१ रोजी सकाळी ९ वाजता राहते घर रसुल नगर मधून निघणार असून बाहेरपुरा भागातील नूर मस्जिद मध्ये त्यांचेवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
पाचोरा शहरातील प्रथम मुस्लिम शिवसैनिक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केल्याने त्यांना ‘जावेद सेना’ नावाने ख्याती मिळाली होती. आ.किशोर अप्पा पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता असल्याने त्यांना गत २०१६ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून मिळालेल्या उमेदवारी मिळवून त्यांनी चुरशीची लढत दिली होती. त्यांच्या पश्चात पत्नी,आई,वडील, ३ भाऊ बहिणी असा परिवार आहे.