मोटरसायकल चोरीतील आरोपीस पाचोरा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा, १२ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिन्याची कैद सुनावली

0
1117

आरोग्यदुत न्युज

चिंतामण पाटील ग्रामीण (प्रतिनिधी)

दि,०३/१/२०२२
पाचोरा मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस २ वर्षाची शिक्षा व १२ हजार रुपयांचा दंड
– दंड न भरल्यास १ महिन्याची कैद….
मोटरसायकल चोरीतील आरोपीस दि. ३ जानेवारी रोजी पाचोरा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा, १२ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिन्याची कैद सुनावली आहे. जामनेर तालुक्यातील जंगीपुरा येथील आरोपी गणेश बाबुलाल राजपुत याचेवर पाचोरा येथील राजेश सुरेशचंद्र कोंडवानी यांच्या फिर्यादीवरून कलम ३७९ व ३४ नुसार मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाचोरा न्यायालयात न्याय प्रविष्ट असलेल्या या दाव्यात न्यायालयाचे न्यायमूर्ती एफ. के. सिद्दीकी यांनी दि. ३ जानेवारी रोजी निकाल देत आरोपी गणेश बाबुलाल राजपुत यास २ वर्षांची शिक्षा, १२ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची कैद असा निकाल दिला असुन या प्रकरणी तपासी अंमलदार म्हणून छबुलाल नागरे, कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल दिपक (आबा) पाटील, केस वाॅच म्हणुन विकास सुर्यवंशी, राजेंद्र पाटील यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे अॅड. रमेश खंडु माने तर आरैपी पक्षातर्फे अॅड. चंदन राजपुत यांनी कामकाज पाहिले.