ब्रेक फेल झाल्याने चालकाच्या प्रसंगावधानने वाचले पाच जणांचे प्राण

0
1569

आरोग्यदुत न्युज

युवराज राजपुरे

नाशिक जिल्हा (प्रतिनिधी)
दि. 2 जानेवारी 2022
ब्रेक फेल झाल्याने चालकाच्या प्रसंगावधानने वाचले पाच जणांचे प्राण

महामार्गावरील इगतपुरी येथील घटना
मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी शिवारातील शक्तीधाम मंदिरासमोर नाशिकहून मुंबई कडे जाणाऱ्या एका वाहनांचे ब्रेक फेल झाल्याने केवळ चालकाच्या प्रसंगावधानने पाच जणांचे प्राण वाचले आहेत.या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारे  MH 04,JB 7429 हे वाहन भरधाव वेगाने जात असताना अचानक वाहनांचे ब्रेक निकामी झाले.याबाबत ची कल्पना चालकाला येताच त्याने प्रसंगावधान राखून नियंत्रण मिळविले.व वाहन जवळील झाडावर नेऊन आदळले.दरम्यान या अपघातात चालक दीपेश छतरे वय 40 यासह  मीना छतरे वय 46,साखार छतरे वय 52 विष्णू छतरे वय 46 देबु छतरे वय38 हे किरकोळ जखमी झाले.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच
जगद्गुरु नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र कैलास गतीर मिळाली त्यांनी तातडीने अपघातातील जखमींना
इगतपुरी ग्रामीण रुग्णालय नेले सुदैवाने कोणाला जास्त  दुखापत झाली नाही.याबाबत महामार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.