१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु झाल्यानंतर राजेश टोपेंनी मोदी सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

0
508

आरोग्यदुत न्युज

युवराज राजपुरे

नाशिक जिल्हा (प्रतिनिधी)
दि. 2 जानेवारी 2022
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु झाल्यानंतर राजेश टोपेंनी मोदी सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी
मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात आली आहे.करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण
(Coronavirus Vaccination for Childrens in इंडिया
आजपासून सुरू झालं आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येणार असून, राज्यातील ६५० केंद्रांवर सुमारे साठ लाख मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम दिसून येतील असं मत व्यक्त केलंय. तसेच टोपे यांनी यावेळेस आता केंद्राकडे १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मागणी केल्याचंही म्हटलंय.
आज जालन्यात टोपे यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर टोपे हे पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात ओमायक्रॉन रुग्ण वाढले असले तरी लॉकडाउनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगळी आहे. त्यामुळे लॉकडाउनबाबत राज्यांना समान निकष असायला हवे असंही टोपे म्हणाले.
मुलांच्या लसीकरणाची मोहीम शाळेत राबवण्याची आमची इच्छा होती पण लसीकरणामुळे लहान मुलांना काही त्रास झाल्यास तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे त्यामुळे दवाखान्यात लसीकरण करण्यात येत आहे, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
राज्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रत्येक कार्यक्रमात गर्दी टाळावी असंही टोपे यांनी सांगितलं. कोरोना वाढत असल्यानं प्रत्येकानं काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.